अवकाशातील चंद्र आणि कुतुहूल

रोजचा दिवस सूर्योद्याशिवाय जसा सुरु होत नाही तसेच रात्र चंद्रशिवाय सुनी वाटते, नाही? जरी सूर्यनारायण आपल्याला न चुकता दर्शन देत असले तरी चंद्र मात्र कलेकलेने येतो आणि पौर्णिमेला पूर्ण तर अमावास्येला आकाशात दिसत नाही. पण तुम्हाला काय वाटते, हा चंद्र जात तरी कुठे असेल? गंमत अशी आहे कि चंद्र तिथेच असतो पण चंद्राचा आपल्याला दिसणार […]

प्रकृतीचा दुर्लक्षित पैलू

लेखक: योगेश फडतरे  (y.phadtare14@gmail.com) आपण गेल्या शतकभरात विज्ञानाच्या सहाय्याने प्रकृतीचे अनेक नियम शिकलो. वेगवेगळ्या जंतुजन्य आजारांवर आपल्याला गेल्या शतकभरात मात करता आली. इन्शुलिनचा शोध डायबिटीसच्या रुग्णांसाठी वरदान देणारे संशोधन ठरलं. मानवी प्रकृतीचे, प्रत्येक अवयवांचे वेगवेगळे आजार आपण ऐकत आणि वाचत असतो. प्रकृतीत डोळे, कान, नाक, घसा, स्वादुपिंड, मुत्रपिंड, आणि हाडे आजारी पडतात, त्यांची वेगवेगळी लक्षणे […]

लसीकरणाचे स्पष्टीकरण (उत्तरार्ध)

लेखक: विक्रांत घाणेकर (visughanekar@gmail.com) आपण या लेखमालेच्या पूर्वार्धात बघितले कि आपली संरक्षण यंत्रणा किंबहुना अँटीबॉडी निर्माण करण्याची यंत्रणा कशी काम करते. हे कार्य विस्तृतपणे सांगण्याचा उद्देश असा कि कोणतीही लस याच यंत्रणेला हाताशी धरून आपला हेतू साध्य करते. त्यामुळे लसीकरणामागचा सिद्धांत समजायला आता जास्त सोपे जाईल. लसीकरणाचे  तत्व: लस हा प्रकार साधारणतः ‘उपचारांपेक्षा प्रतिबंध योग्य’ […]

चक्रिवादळ: एक आव्हान!

चक्रिवादळ हे पृथ्वीवर होणारे सर्वात तीव्र वादळ होय. या वादळातील वाऱ्याच्या गतीनुसार  त्याला वादळ, तुफान, किंवा चक्रीवादळ अशी विभागणी केली जाते, तर त्याच्या उगमस्थानावरून त्यांना वेगवेगळी नावे दिली जातात, जसे कि अलीकडेच झालेली अँफन, फानी, अथवा आता येऊ घातलेले निसर्ग चक्रीवादळ! शक्यतो विषुववृत्तावर अथवा जवळील भागात तयार होणाऱ्या या वादळांना उष्णकटिबंधीय वादळे म्हणतात.  चक्रीवादळ तयार कसे होते?  विषुववृत्तावरील समुद्रातील दमट […]

लसीकरणाचे स्पष्टीकरण (पूर्वार्ध)

लेखक: विक्रांत घाणेकर (visughanekar@gmail.com) थोडासा इतिहास: कोविड १९ च्या निमित्ताने विविध उपचार पद्धतींचा उहापोह चालू झाला आहे. माझ्या मागील ब्लॉगनंतर काही आप्तजणांनी ‘पोलिओ लस असते तशी याची नाही का? लसीकरण म्हणजे नक्की काय? लस म्हणजे औषधच ना?’ अशा प्रश्नाची सरबत्ती केली. या उत्सुकतेत भर म्हणजे नुकतेच बातम्यात सांगितले गेले कि जर्मनी, UK मध्ये संशोधित कोविड […]

व्यसन मजा नव्हे आजार

लेखक: योगेश फडतरे  (y.phadtare14@gmail.com) सध्या लॉकडाऊनचा काळ सुरू आहे. या काळात आपण सर्वजण घरी आहोत. अशा काळात सरकारकडून दारू दुकानं उघडण्याच्या सूचना आल्या, तेव्हा या दारूच्या दुकानांवर बरेच विनोद ऐकायला आणि वाचायला मिळाले. दारू ही कुणासाठी एक मजा असते तर  अनेकांसाठी मात्र सजा असते. काही लोकांना दारू मजा म्हणून पिता येते. काही लोकांना मात्र दारूचं […]

गो फाल्कन, गो ह्युमन!!

© सिद्धी नितीन महाजन ( snmhjn33@gmail.com ) https://shabdsiddhi.wordpress.com/ २०२० हे वर्ष नक्कीच वेगवेगळ्या कारणांसाठी संस्मरणीय असणार आहे. कोरोना महामारीमुळे या वर्षाच्या स्मृती मानवजातीच्या इतिहासातून कधीच पुसल्या जाणार नाहीत. पण हे वर्ष अजुन काहीतरी इंटरेस्टिंग घेऊन येतंय! अंतराळ पर्यटन युगाचा उदय! वरचा शब्द ऐकून तुमच्या मनात प्रश्न उभा राहिला असेल, ही कोणती नवीन संकल्पना? १२ एप्रिल […]

नवीन कोरोनाविषाणू पासून कोविड-१९ पर्यंतचा प्रवास

सध्या जगभर धुमाकुळ घातलेला कोविड-१९ या रोगाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतचं चालेले आहे. भारतामध्येही या रोगाने आपले पाय रोवायला जोमाने सुरवात केली आहे. भारतात मार्च, २०२० च्या तिसऱ्या आठवड्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या जवळजवळ ४०० च्या घरात जाऊन पोहोचली आहे. कोविड-१९ हा नवीन कोरोनाविषाणू (novel coronavirus) पासून प्रसार होणारा रोग आहे. हा विषाणू रेषात्मक असून त्यामध्ये एकल […]

error

Enjoy this blog? Please spread the word :)