लेखक: योगेश फडतरे (y.phadtare14@gmail.com)
आपण गेल्या शतकभरात विज्ञानाच्या सहाय्याने प्रकृतीचे अनेक नियम शिकलो. वेगवेगळ्या जंतुजन्य आजारांवर आपल्याला गेल्या शतकभरात मात करता आली. इन्शुलिनचा शोध डायबिटीसच्या रुग्णांसाठी वरदान देणारे संशोधन ठरलं. मानवी प्रकृतीचे, प्रत्येक अवयवांचे वेगवेगळे आजार आपण ऐकत आणि वाचत असतो.
प्रकृतीत डोळे, कान, नाक, घसा, स्वादुपिंड, मुत्रपिंड, आणि हाडे आजारी पडतात, त्यांची वेगवेगळी लक्षणे दिसून येतात त्याबद्दल समाजात बऱ्यापैकी बोलले जाते. जागरुकता अनेक ठिकाणी दिसते. काही लोक अजूनही प्रकृतीबाबत दुर्लक्षच करतात. असो. पण प्रकृतीच्या एका अवयवाबद्दल प्रचंड कुतूहल माणसाला याआधी होती, आणि पुढेही कायम राहील, तो म्हणजे मेंदू!
मेंदूमधल्या रसायनंत बदल झाल्याने होणारे आजार, हे सरळ नियंत्रका(मेंदूतील लिंबिक सिस्टीम) वर घाला घालतात. त्यामुळे त्यांच्या बदलातून माणसाच्या वर्तनात बदल होतो. या सगळ्या आजाराचं प्रकरण सायकियाट्री, सायकॉलॉजिमध्ये अभ्यासता येतं. यातला सर्वात कॉमन पण ज्या बद्दल बोललं जात नाही असा आजार म्हणजे डिप्रेशन.
डिप्रेशन (नैराश्य)
हा आजार इतर शारीरिक आजारांपेक्षा खूपच वेगळा आहे. कारण हा अनेक महिने, अनेक वर्षे टिकून राहतो आणि आपल्याला हा आजार झालाय हे स्वीकारण्यात माणसाला कमीपणा वाटतो. जणू मेंदूचे आजार माणसाला होऊ शकत नाहीत अश्या आविर्भावात आपण असतो. पण समाजात नियमित आढळणारा हा आजार गंभीर असला तरी पूर्ण बरा होऊ शकतो असा आहे. आणि उपचार घेतल्यास त्यास घाबरण्याचं काहीच म्हणजे अगदी काहीच कारण नाही.
सविस्तर सांगावं तर डिप्रेशनच्या आजारात मेंदू मध्ये सिरोटॉनिन नावाचं द्रव्य कमी होतं. मेंदूतल्या दोन पेशीतल्या जोडण्या मध्ये एक पोकळी असते, या पोकळीत सिरोटॉनिन या रसायनाची मात्रा कमी झाल्यास मूड वर परिणाम होतो.व माणसाला निगेटिव्ह वाटू लागते. औषधाने ती मात्रा वाढवली की रुग्णाला बरे वाटते. यात ईतर अनेक गोष्टी सामील असतात. पण त्याकडे तुर्तास दुर्लक्ष करू. पुर्वी आपण जंतुजन्य आजारांनीच मरत असू तेव्हा यासम आजाराविषयी बोलले जात नसे. पण आता विज्ञानयुगात आपली सर्वांची कामं बुद्धिजीवी वर्गात मोडतात तेव्हा बुद्धीला त्रास देणाऱ्या आजाराबद्दल आपण बोलायला हवे.
आपल्या मानवी मेंदूत लिंबिक सिस्टिम हा अवयव समूह आहे. यात अनेक लहान अवयव आहेत त्यात अमिगडाला आणि हायपोथॅलॅम्स यांचा समूह आहे. त्यातून न्यूरल पेशींतील सिरोटॉनिन, डोपमाईन, नोरेपीनेफ्रिन या रसायनाची मात्रा राखण्याचे काम चालते. या अवयवात गडबड झाली की डिप्रेशन येतं. शरीरातील सिरोटॉनिन वगैरे अजून मोजता येत नाही. त्यामुळे लक्षणांवरून उपचार करावे लागतात.
तुम्हाला कधी डिप्रेशन सदृश भावना आल्या तर स्वतःला दोष देण्यापूर्वी या मेंदू रसायनाची आठवण काढा आणि उपचार करून घ्या…
मनोविकार समजून घ्या।
गैरसमज टाळा.
Nice
खूप माहितीपूर्ण आणि सुंदर लेख.
अप्रतिम लेख योगेश, सुंदर मांडणी आणि सामान्य माणसाला मानसिक आरोग्य विषयी जागरूक करण्याचा प्रयत्न कौतुकस्पद आहे.💐
असेच लेख सादर करत जा, जे आजच्या स्पर्धत्मक जगात लोकं मध्ये लगेच नकारात्मक भावना जागृत होते आणि ती मारक ठरते.